News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या
Advertisements
Advertisements
>>> निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्या संदर्भात आयोजित निवडणूक आयोगाची बैठक आज संपल्यामुळे आता कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. सर्वांचे निवडणूक आयोगाकडे लक्ष.
>>> विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीतील काही उमेदवारांच्या जागांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हि दोन्ही ही पक्षांच्या दृष्टीने डोके दुखी झाली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
>>> जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि डॉ. सुजय विखे यांचा एकत्रित हेलिकॉप्टर प्रवास. भाजपची बैठक आटोपून मंत्री महाजन डॉ. विखे यांना घेऊन विखेंच्याच हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना
>>> तिकीट वाटपावरून भाजप-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
>>> मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांना अक्षरशः ठोकून काढले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत काय भूमिका राहील हे वेळेवर सांगू असे सांगून राजकारणात वेगळी रंगात आणली आहे. ट्रोल करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा, असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले .
>>> खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात दिलजमाई करण्यात शरद पवार यशस्वी झाले असल्याने या वादावर तूर्त पडदा पडला आहे.
>>> औरंगाबादच्या जागेवर निवडणूक लढवणार : कोळसेपाटील यांचा निर्धार
>>> पुण्याच्या जागेबाबत अद्याप काँग्रेसचा कुठलाही निर्णय नाही, प्रवीण गायकवाड यांचा दिल्ली दौरा
>>> मुंबईत आकाश अंबानीच्या लग्नात शाहरुख खानचा डान्स, भिनेते रजनीकांत यांची उपस्थिती
>>> जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दहा लाखाची मदत
