Jammu Kashmir : नववीत शिकणाऱ्या मुलाने ५० हजारासाठी केला ग्रेनेड हल्ला !!

जम्मू बसस्थानकावरील ग्रेनेड हल्ला केवळ ५० हजार रुपयांसाठी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात सामील असलेल्या एका हल्लेखोराच्या चौकशीदरम्यान ही बाब समोर आली आहे.
जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड फेकण्यासाठी हल्लेखोराला हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याकडून ५० हजार रुपये देण्यात आले होते, अशी कबुली हल्लेखोराने दिली. हल्लेखोराला अटक केल्यानंतर त्याचे आधार कार्ड आणि शालेय दस्ताऐवज तपासल्यानंतर सदर हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जम्मूतील जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना हिज्बुल कमांडर फैय्याजने आखल्याचं तपासाअंती पोलिसांना समजले. या हल्ल्यातील हल्लेखोर आपल्या भावंडांमध्ये सर्वांत मोठा असून, तो नववीत शिकत असल्याचं समजते .जम्मूतील एका बस स्टँडजवळ केलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले होते.