News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

देशातलेच काही लोक पाकिस्तानची मदत करत आहेत-मोदी
>> आपल्याच देशातील काही लोक पाकिस्तानची मदत करत आहेत ही बाब दुर्दैवी आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. त्याच पाठोपाठ त्यांनी गाझियाबाद या ठिकाणीही भाषण केले.
1. नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण, सूत्रांची माहिती
2. भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरी वन डे: विराट कोहलीनं झळकावलं शतक, भारत. वि. ऑस्ट्रेलिया वनडेः भारतासमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान
3. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
4. औरंगाबाद : बीड बायपासवर ट्रक-मोटरसायकल अपघातात स्नेहल बावळे ही महिला जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी
5. भारतीय सैन्य सेवेतील काही क्षेत्रांत महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा सरकारने अलीकडेच घेतला निर्णय: पंतप्रधान मोदी
6. मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने योग्य निर्णयासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याचे दिले निर्देश, मतदान कार्ड आधारशी जोडण्याचे आदेश देणाऱ्या मागणीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार
7. अयोध्या : तीन मध्यस्थ सदस्यांना इतर सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार, मध्यस्थी प्रक्रिया इन कॅमेरा होणार
8. ग्वालियरमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची ३ दिवसीय वार्षिक बैठक
9. दिल्ली: एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
10. अकोला : बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे रेती खोदताना मजुराचा मृत्यू