Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Spread the love

लिहून घ्या… महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही’.
आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसी, कानपूर आणि गाझियाबाद दौऱ्यावर

२. जम्मू काश्मीरः बस स्थानकावरील स्फोटानंतर पकडण्यात आलेल्या आरोपीने गुन्हा कबूल केल्याची पोलिसांची माहिती, हल्ल्यामागे ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’चा हात असल्याचा पोलिसांना संशय

३. ग्रेनेड हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या भरपाईची घोषणा

४. आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा बोलावली होती. बोर्डाने निविदा स्वीकारली. लवकरच नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम होणार सुरूः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५. नागपूर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण, शहरातील प्रत्येक चौकात लाऊडस्पीकर व ट्रॅफिक स्क्रीनवर मेट्रो लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

६. जूननंतर नागपूरला येणार असल्याचं पंतप्रधान मोदींचे आश्वासन

७. काँग्रेसच्या काळात देशात २५० किमी मेट्रोचे नेटवर्क होते; अवघ्या ५ वर्षात ६५० किमी पर्यंत ते वाढले नेटवर्कः पंतप्रधान नरेंद्र मोदी

८. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या करणार प्रारंभ

९.  आमदार अतुल सावे यांच्या वतीने औरंगाबाद घाटी रुग्णालयाला १० स्ट्रेचर भेट

१०. दिव्यांगांना सुखद धक्का..”शिवशाही” मध्ये आजपासून सवलत लागू

११. बहुजन वंचित आघाडीच्या सभेला पनवेलमध्ये सुरुवात

१२. मातंग आरक्षण: अखेर संजय ताकतोडे यांच्यावर दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांचा निर्णय

१२. फोनवर अश्लील संभाषण केल्याने बीड , केजचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना महिला शिक्षिकेने केली मारहाण.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!