दिल्लीत काँग्रेसचे भाजपशी साटेलोटे : अरविंद केजरीवाल

केंद्रातील मोदी सरकार , भाजप आणि शहा यांच्या विरोधात लाट असताना आप अर्थात आम आदमी पक्षासोबत आम्ही एकत्र येणार नाही असं काँग्रेसने जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्या अंतर्गत छुपा समझौता झाला असल्याची अफवा रंगली असल्याचे ट्विट करीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची पडद्याआड हातमिळवणी झाली आहे असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आपसोबत हातमिळवणी नाही असं काँग्रेसने जाहीर करताच एक ट्विट करून अरविंद केजरीवाल यांनी हा आरोप केला आहे.काँग्रेसने भाजपासोबत छुपी हातमिळवणी केली आहे अशा अफवा आहेत. मात्र दिल्ली या छुप्या युतीसोबतही लढण्यास तयार आहे असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या एअर स्ट्राईकनंतर येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आप दिल्लीत एकत्र लढणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या संदर्भात काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आपसोबत युती करणार नाही काँग्रेस दिल्लीत स्वबळावर लढणार हे स्पष्ट केले. या घोषणेनंतर काही वेळातच केजरीवाल यांनी ट्विट करून काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला.