News Updates , गल्ली ते दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलटचे फोटो व्हिडीओ शेअर करू नका : सुरक्षा यंत्रणा

News Updates ,
गल्ली ते दिल्ली : News Updates
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलटचे छायाचित्र, व्हिडीओ अपलोड अथवा शेअर न करण्याचे सुरक्षा यंत्रणांचे भारतीय जनतेला आवाहन.
भारताविरुद्धच्या पाकिस्तानची हि मानसिक खेळी असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या : एकनजर
१. सैन्य दलाच्या उच्चायुक्तांच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून लष्कराला फ्री हँड; पाकवर पुन्हा प्रहाराची शक्यताः सूत्रांची माहिती.
२. तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर कॅनडाकडून भारतातील उड्डाणे रद्द.
३. पुलवामा हल्ल्यासंदर्भातील विरोधकांच्या आरोपांचं भाजपकडून खंडन.
४. भारतावरील आजचा हल्ला स्वसंरक्षणाचा अधिकार, इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवण्यासाठी होता. आम्हाला युद्ध नको आहे. सर्व प्रलंबित प्रश्न भारत चर्चेच्या माध्यमातून सोडवेल, अशी आम्हाला आशा आहे: पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी
५. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला पायलट सुखरूप येत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करावेत. आपला पायलट पाकच्या ताब्यात असून, करदात्यांच्या पैशावर कार्यक्रम करण्याची ही योग्य वेळ नाहीः नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचं ट्विट
६. समझोता एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील बदलाची कोणत्याही स्वरुपाची माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही. यासंदर्भात दिलेल्या सूचनांचं रेल्वे पालन करेल; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती
७. पुलवामा हल्ल्याबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याकडून सहानुभूती व्यक्त; दोन्ही देशांशी संवाद साधला असून, संयम ठेवण्याचे मे यांचे आवाहन
८. देशाच्या सुरक्षिततेसाठी, अखंडत्वासाठी सीमाभागातील दहशतवादी कारवायांविरोधात ठोस पावले उचल्याचा आम्हाला अधिकार; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट
९. माढ्यातुन पवारांच्या विरोधात खा. राजू शेट्टी यांनी निवडणूक आखाड्यात : माढा लोकसभा मतदारसंघ मेळाव्यात एकमुखी ठराव.
१०. निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमधील ४ सहायक पोलीस आयुक्त, १६ निरीक्षक, १० फौजदारांच्या अंतर्गत बदल्या
११. स्टेट बँक ऑफ इंडिया , औरंगाबादच्या ७४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी लक्ष्मण विश्वनाथ वाघमारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
१२. पुणेः मतीमंद तरूणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करणार्या चौघांना २० वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजार रूपये दंडाची शिक्षा
१३. जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून केल्याप्रकरणी चार नातेवाईकांसह दहा आरोपींना दुहेरी जन्मठेप आणि साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा
१४. औरंगाबादः १४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा वरिष्ठ सहायक संजीव इंगले गजाआड
१५. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारची २०१९-२० च्या अर्थसंकल्पात २३० कोटी रुपयांची तरतूद
१६. नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते वसंत आबाजी डहाके यांना प्रदान
१७. मुंबईः विधिमंडळ अधिवेशनाची उद्या होणार सांगता.
१८. औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती