IAF Air Strike : हवाई दलाच्या कारवाईचा काँग्रेससह २१ विरोधीपक्षांना अभिमान

नवी दिल्लीत बुधवारी पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर त्यांनी सैन्याच्या कारवाईला पाठींबा दर्शवला. तसेच पुलवामा हल्ल्याच्या यावेळी विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला. बैठकीत काँग्रेससहीत २१ विरोधीपक्षांनी आपल्याला हवाई दलाच्या कारवाईचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. यावेळी राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्यावतीने भूमिका मांडली. ते म्हणाले, अशा वेळी आम्ही आपल्या जवानांच्याबाजूने उभे आहोत.
सकाळी कारवाईदरम्यान आपल्या एका बेपत्ता पायलटबाबत आम्हाला काळजी वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेच्या संरक्षणासाठी सरकारने संपूर्ण देशाला विश्वासात घ्यावे असे आवाहन यावेळी विरोधीपक्षाच्या नेत्यांनी सरकारला करण्यात आले.पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटची सुखरूप सुटका व्हावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.