Pakistan : युद्धजन्य परिस्थितीला ब्रेक देत पुलवामाच्या चौकशीला पाकिस्तान तयार

पुलवामामध्ये जी दु:खद घटना घडली तिची चौकशी करण्यास व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली आहे. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणितं चुकतात असं सांगत खान यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला देत पाकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर इम्रान यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
पुलवामामध्ये भारतीय लष्कराचे ४१ जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यानंतर भारतानं तेराव्या दिवशी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत जैश ए मोहम्मदच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती ओढवली असून भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्ताननं थारा देऊ नये असं सांगत अमेरिका व चीननंही भारताच्या बाजुनं मत व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानला उपरती झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य वरवरचे आहे की त्यात सत्याचा अंश आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पुलवामा प्रकरणाची चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत इम्रान खान यांनी एकप्रकारे भारतासमोर नांगी टाकल्याचे दिसत आहे.
भारताने मंगळवारी बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले. पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर सीमारेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्यांनी तो हाणून पाडला. परिस्थिती तणावपूर्ण असून भारत आणि पाकिस्तानमधील महत्त्वाची विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत.