#गल्ली ते दिल्ली : News Updates : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

१. दिल्लीः अयोध्या प्रकरणातील याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
२. पुणेः पुण्यातील कर्णबधीर आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा विस्तृत अहवाल देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश; राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना
३. इस्लामाबादः जैश संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला रावळपिंडीहून बहावलपूर येथे हलवले४. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून प्रद्युत देब बर्मन यांची त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
५. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
कर्णबधिर आंदोलकांचा सरकारला शाप लागेल: राज ठाकरे.
६. पुलवामा हल्ल्यातील गाडीचा आणि मालकाचा लागला शोध; सज्जाद भट्ट नामक व्यक्तिची होती गाडी, जैश संघटनेशी जोडला गेल्याची शक्यता
७. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर
८. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू २७ फेब्रुवारी रोजी दिल्ली दौऱ्यावर
९. आम्ही एनडीएमध्येच राहणार आहोत. शिवसेना आणि भाजपकडून आम्हाला मुंबई आणि राज्यात १-१ जागा हवी आहे, हीच आमची मागणी आहे – केंद्रीयमंत्री रामदास आठवले
१०. आसामः विषारी दारू पिऊन मृत पावलेल्यांची संख्या १५७ वर
११. कलम ३५ अ’ची मोडतोड करू नका. अन्यथा १९४७ पेक्षा भयंकर परिणाम बघावे लागतील. काश्मिरी जनता तिरंग्याव्यक्तिरिक्त कोणता पर्याय निवडेल, याची कल्पना कोणी करू शकत नाही – पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती
१२. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकांचं लोकार्पण; २५ हजार ९४२ शहिदांची नावे कोरली
१३. औरंगाबाद: बारावी, दहावी उत्तरपत्रिका तपासणीवर ‘मुप्टा’ महाराष्ट्र विनानुदानित शिक्षक संघटनेने टाकला बहिष्कार
१४. अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यात बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून घेत आत्महत्या; परीक्षेच्या ताणावातून आत्महत्या केल्याचा संशय
१५. औरंगाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांची विष पिऊन आत्महत्या
१६. लता मंगेशकर यांच्याकडून जवानांना १ कोटींची मदत
१७. मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा संतप्त कर्णबधीर आंदोलकांचा इशारा