OSCAR 2019 : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘रोमा’ला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा मान

या वर्षीचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकनं होती त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं आपली मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार ‘रोमा’ या चित्रपटाला मिळाला. तसेच रोमाने बेस्ट सिनेमटॉग्रफीचा पुरस्कार देखील पटकावला आहे. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. सर्वोत्तम चित्रपटाच्या शर्यतीत एकूण आठ चित्रपट होते. सुरूवातीपासूनच ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र बाजी ‘ग्रीन बुक’ मारली . ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ या चित्रपटानं प्रत्येकी चार ऑस्कर पटकावले आहे. तर ‘ब्लॅक पँथर’ नं तीन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ चित्रपटात फ्रेडी मर्क्युरीच्या भूमिकेत असलेल्या रॅमी मॅलेकला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ‘फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ११ वर्षांनतर पहिल्यांदाच स्पायडरमॅन आणि ब्लॅकपँथर या सुपरहिरोंनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘स्पायडरमॅन’ला सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे.
‘दी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडला आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फान्सो क्वारोन : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर अल्फान्सो क्वारोन यांना रोमा चित्रपटासाठी देण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांनी ४ ऑस्कर पटाकावले आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओलिविया कोलमन
फेव्हरेट चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या गटात ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रॅमी मॅलेक
‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’साठी रॅमी मॅलेकला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार
यांनाही मिळाले पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)
सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन
सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर
या वर्षीच्या अकादमी पुरस्कारांमध्ये हॉलिवूडपट ‘रोमा’ला १० विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती. गेल्या वर्षी ऑस्करमध्ये ‘द शेप ऑफ वॉटर’ला सर्वात जास्त नामांकने प्राप्त झाली होती. हा चित्रपट ऑस्करच्या इतिहासात सर्वाधिक श्रेणींमध्ये नामांकित होणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. २०१८मध्ये अकादमी पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला १३ विविध श्रेणींमझ्ये नामांकित करण्यात आले होते. यात या चित्रपटाने ४ पुरस्कार पटकावले होते. या व्यतिरिक्त ‘ऑल अबाउट ईव्ह’, ‘टायटॅनिक’ आणि ला ला लँड या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळालेली होती.