गल्ली ते दिल्ली : एक नजर #News Updates

१. आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २६ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी दौऱ्यावर
२. राज्यातील शेतकऱ्यांना १३ हजार कोटींची विम्याची नुकसान भरपाई दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३. प्रयागराजः चालत्या बसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार
४. बांगलादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न फसला अपहरण करणाऱ्या बंदुकधारी व्यक्तिला गोळी घालून केले ठार
५. संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारातील भोरच्या मळ्यात बिबट्याने साडेतीन वर्षाची मुलगी घरासमोरून नेली उचलून; बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू
६. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटची संधी म्हणून जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवस राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १५ हजार ४०२ मतदारांकडून अर्ज दाखल
७. नागपूरात नंदनवनमध्ये राहुल तुरकेल नामक युवकाची निर्घृण हत्या
८. कुलगाम चकमकः आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याची शक्यता; मारले गेलेले दहशतवादी जैश संघटनेचे : पोलीस महासंचालक दिलबाग
९. पंतप्रधान मोदी करणार ८०० किलोच्या भगवद्गीतचे अनावरण
१०. पुश-अप्स चॅलेंज स्वीकारून शहिदांसाठी सचिनने जमवले १५ लाख
११. डॉ. सुजय विखे भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत; पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली तर त्याचा विचार होईल: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन