Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बाथरूममधील महिलेचे मोबाईल चित्रिकरण : आयटी इंजिनिअरला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

बाथरूममधील महिलेचे चित्रीकरण केल्याच्या आरोपावरून एका आयटी इंजिनीअर असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ३४ वर्षीय तरुण विवाहित असून ढोकाळी येथील एका सोसायटीत तो राहतो. शुक्रवारी रात्री याच सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहणारी एक महिला रात्री १०.३० वाजता बाथरूमला गेली होती. त्यावेळी बाथरूमच्या खिडकीतून कोणीतरी मोबाइलमध्ये चित्रिकरण करत असल्याचे दिसले. तिने ही बाब पतीला सांगितली. नंतर सोसायटीत आरडाओरडा झाल्यानंतर या तरुणाला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी दिली. आरोपीने यापूर्वी आणखी कोणाचे मोबाइलमध्ये चित्रिकरण केले आहे का, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!