Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

About Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …

Spread the love
#विनम्र आवाहन..
मित्रांनो ,
http://www.mahanayakonline.com/ हे आपल्या हक्काचे वेब पोर्टल आणि २४ x ७ युट्युब न्यूज चॅनल जानेवारीपासूनच आपल्या सेवेत रुजू करण्याची आमची संकल्पना होती. शिवजयंतीदिनी , १९ फेब्रुवारीला तरी आपल्या सेवेत रुजू व्हावे अशी इच्छा होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे इच्छापूर्ती झाली नाही . वेबपोर्टल पूर्णतः तयार असून Mahanayakonline २४ x ७ युट्युब न्यूज चॅनलला आणखी थोडा विलंब होत आहे. खरे तर डिजिटल मीडियाच्या स्पर्धेत कोणी कोणासाठी थांबत नाही आपण इतरांच्या ज्या ज्या बातम्या शेअर करता त्यापैकी अनेक बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत फक्त काही मित्रांचे याकडे लक्ष नसते एवढेच.
#आपल्या वेबपोर्टलचे वेगळेपण
आपल्या अवती-भवती इतके सारे वेब न्यूज पोर्टल असताना आपले वेगळेपण काय ? हे तुम्हाला शेअर करणे आवश्यक आहे . मित्रांनो , घडलेल्या घटना , बातम्या याची माहिती आपल्याला मिळतेच परंतु या घटनेमागची घटना , बातमी मागची बातमी , विषयामागचा विषय आणि आशय , दिलेल्या , पेरलेल्या बातम्यांच्या मागचा नेमका अर्थ देण्याची गरज भासल्याने आपण http://www.mahanayakonline.com/ आणि Mahanayakonline २४ x ७ युट्युब न्यूज चॅनल सुरु करीत आहोत . अर्थात त्यासाठी आपल्या सक्रिय सहभागाची गरज आहे .
आपण अशी मदत करू शकता
http://www.mahanayakonline.com/ आणि Mahanayakonline 24 x 7 युट्युब न्यूज चॅनलला आपण पुढीलप्रमाणे मदत करू शकता.
१. या दोन्हीही सेवा मोफत आणि सशुल्क दोन्हीही प्रकारच्या आहेत . अर्थात ऐच्छिक. कारण
२. या सेवा प्राप्त करण्यासाठी आपली इच्छा असल्यास आपणास मासिक ९९ रुपये सहयोग द्यावा लागणार आहे .
३. ज्यांना या सेवा सहयोग न देता हव्या आहेत त्यांनाही आपण या सेवा प्रदान करणार आहोत.
४. आपल्यापैकी ज्यांची न्यूज वेबपोर्टल आणि युट्युब न्यूज चॅनलसाठी जिल्हा वार्ताहर , तालुका वार्ताहर म्हणून काम करण्याची इच्छा आहे ते आपले अर्ज chiefeditor@mahanayakonline. com या e-mail वर पाठवू शकतात.
५. ज्यांची वार्ताहर म्हणून निवड होईल ते महानायक न्यूज वेबपोर्टल आणि युट्युब न्यूज चॅनलसाठी बातम्या व्हिडीवो पाठवू शकतात.
६. ज्यांची निवड होणार नाही त्यांना सुद्धा बातम्या आणि व्हिडीवो पाठविण्याची परवानगी राहील.
७. आपण या महानायक न्यूज वेबपोर्टल आणि युट्युब न्यूज चॅनलसाठी आपल्या जाहिराती पाठवून आर्थिक सहयोग देऊ शकता. किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती व संस्था यांना जाहिरात सहाय्य देण्याबाबत प्रवृत्त करू शकता.
#वेबपोर्टल आणि न्यूज चॅनल मध्ये काय आहे ?
> आपण जर http://www.mahanayakonline.com/ वर गेलात तर आपणास मेन्यू मध्ये कव्हर केलेले विषय आपणास सहज लक्षात येतील कि , वेबपोर्टलमध्ये कुठे काय आहे ?
> सर्वसाधारण युजर्सला समजेल अशा अतिशय सोप्या पद्धतीने Mahanayakonline वेबपोर्टलची आकर्षक रचना केलेली आहे.
> सर्वात महत्वाचे म्हणजे Mahanayak Helpline हे महत्वाचे फिचर आपल्यासाठी देण्यात आले आहे . Information On Demand हे या फीचरचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा कि , आपणास जी मदत लागेल आणि जेथे कुठे मदत लागेल त्या ठिकाणी महानायकची सेवा आपणास देण्याचा आमचा मानस आहे .
> mahanayakonline चे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महानायकाच्या मेन मेन्यू मध्ये आपण ” विविधा ” वर क्लिक केल्यास “किन्नर विश्व ” हा नवीन विषय समाविष्ट केल्याचे आपणास दिसेल. समाजातील स्त्री- पुरुषांबरोबर किन्नर म्हणून माणुसकीची ओळख हरवलेले लोक सुद्धा आपलेच आहेत या भावनेतून “किन्नर ” समाजाला सुद्धा आवाज देण्याचा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे .
मित्रानो ,
या उपक्रमाच्या संदर्भात आपल्या सूचना आणि अभिप्राय आम्हाला हवे आहेत. आपण या ठिकाणीही ते कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता , इनबॉक्समध्येही टाकू शकता किंवा 9421671520 या क्रमांकावर WhatsAapp द्वारे सुद्धा पाठवू शकता .
आपला सन्मित्र
प्रा. बाबा गाडे , ज्येष्ठ पत्रकार , तथा संस्थापक संपादक, औरंगाबाद.
www.mahanayakonline.com

 

2 thoughts on “About Mahanayak : महानायक ऑनलाईन आणि आपण …

  1. दलित उपेक्षितां चा आवाज बुलंद करण्यासाठी महानायकाची गरज होती ती आपण पूर्ण केली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व व वंचितांच्या विकासासाठी वाहून घेतले गेलेले ऑनलाईन न्यूज पोर्टल फार कमी आहेत. बदलणाऱ्या युगाशी साधर्म्य व तादात्म्य पावन्याकरिता व नव्या पिढीशी सुसंगत अशा वैचारिक पाठबळाची आवश्यकता होती . ती आपण पूर्ण केली आहे. आपले अभिनंदन जय भीम.

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!