Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मी नकलाकार आहे तर एवढी धडकी का भरली : भुजबळ -फडणवीस

Spread the love

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रा समारोप सभेत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाषणातून खरपूस समाचार घेतला. भुजबळ म्हणाले की, मी घाबरणार नाही. जगेल तर सिंहा सारखा जगेल. आपण काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काय बोलायचे ते शिकायचे का? फडवणीसांना माझ्या कुठल्या भाषणाचा राग आला, हे त्यांनी सांगावे. अहो, मी ज्यावेळी मुंबईचा महापौर, आमदार होतो, त्यावेळी तुम्ही शाळेत होता, हे लक्षात ठेवा आणि आता मी काय बोलावे हे तुमच्याकडून शिकायचे का ? असा उपरोधात्मक प्रतिप्रश्न भुजबळ यांनी फडणवीस यांना विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आयच्या संयुक्त जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. या सभेच्या समारोप प्रसंगी बोलताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले. वारे शासन तेरा खेल, न्याय मांगा, मिला जेल, असे म्हणत मी नकलाकार आहे. तर एवढी धडकी का भरली, असा प्रश्नतही भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच मी ज्यावेळी मुंबईचा महापौर होतो, मुंबईत आमदार होतो. त्यावेळी आपण शाळेत होता अन् आता मी काय बोलायचं हे तुमच्याकडून शिकायचं का ? असा प्रश्नही भुजबळ यांनी फडणवीस यांना विचारत त्यांच्यावर टीका केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!