Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रोखपालाला बोलण्यात गुंतवून त्यांनी लावला २८ लाखांना चुना

Advertisements
Advertisements
Spread the love

स्टेट बँकेच्या रोखपालाला बोलण्यात गुंतवूनचोरट्यांच्या टोळीने तब्बल २८ लाखांची रोकड लांबविल्याची घटना पुण्यातील सेव्हन लव्हज चौकातील स्टेट बँकेच्या शाखेत घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. सुमारे सात ते आठ जण स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. रोखपाल आणि अन्य व्यक्तिंना बोलण्यात गुंतवून ठेवत रोखपालाच्या मागे पैशांनी भरलेली पेटीच लंपास केली. अन्य व्यक्तिंना पैसे देण्यासाठी रोखपाल मागे वळल्यानंतर रोकड असलेली पेटी लंपास केल्याचे लक्षात आले. या पेटीमध्ये तब्बल २८ लाख रुपये असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. चोरी करणारी ही टोळी शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी पेटीतील पैसे काढून घेऊन ती पेटी टिळक रस्त्यावर टाकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!