जैश-ए-मोहम्मद कार्यालय पाक सरकारच्या नियंत्रणात

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तान वर दबाव येत असून दहशतवाद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाक सरकारने आपली कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याच कारवाईचा एक भाग म्हणून भारताच्या हिटलिस्टवर असलेला दहशतवादी मसूद अजहर याची संघटना असलेल्या जैश-ए- मोहम्मद च्या कार्यालयावर पाकिस्तान नियंत्रण प्राप्त केले असल्याचे वृत्त आहे