देशभर आदरांजली : शहिदांना सलाम; संपूर्ण देश शोकाकुल

पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ७ जण ताब्यात
पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे.पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आसाम (१), बिहार (२), हिमाचल प्रदेश (१), जम्मू-काश्मीर (१), झारखंड (१), कर्नाटक (१), केरळ (१), मध्य प्रदेश (१), महाराष्ट्र (२), ओदिशा (२), पंजाब (४), राजस्थान (५), तमिळनाडू (१), उत्तर प्रदेश (१२), उत्तराखंड (२), पश्चिम बंगाल (१) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे.
> देशभर आदरांजली : शहिदांना सलाम; संपूर्ण देश शोकाकुल
> बुलडाणा: शहीद जवान संजयसिंह राजपूत यांचे पार्थिव मलकापुरात, अंत्ययात्रेला सुरुवात.
> शहीद जवान नितीन राठोड यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतून हजारो नागरिक चोरपांगरात दाखल
> नवी दिल्ली: सरकार आणि सुरक्षादलांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून दहशतवादाचा एकजुटीने मुकाबला करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्धार
> विदर्भानं जिंकला इराणी करंडक; बक्षिसाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा
> धुळे: महाराष्ट्रानंही सुपुत्रांना गमावलं आहे. देशात एकीकडं राग आहे. तर दुसरीकडं प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते प्रदान. दरम्यान त्यांनी अजनी (नागपूर)- पुणे हमसफर एक्सप्रेसला पांढरकवडा येथून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला . त्याचबरोबर त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील महिला स्वयंसहायता बचत गटांना प्रमाणपत्रे आणि धनादेश प्रदान
> पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी काळे कपडे घालून आलेल्यांना प्रवेशबंदी.ज्या पत्रकार, फोटोग्राफर्स काळे कपडे घातले होते त्यांनाही बाहेर काढण्यात आले.
इतर बातम्या …
> अहमदनगर: जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू करा, अन्यथा १९ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार; शिवसेनेचा इशारा
> नागपूर : अंबाझरीतील डॉ.आशिष चौधरी व त्यांच्या पत्नी सपना यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात मोहसीन खानसह दोघांना अटक
> अमेरिकेतील शिकागो बिझनेस सेंटरमध्ये गोळीबार, पाच जणांचा मृत्यू.
> नाशिक: आदिवासी आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी उद्या चर्चा करण्याचे आश्वासन, पोलिसांची मध्यस्थी