शहीद जवानाच्या पार्थिवाला राजनाथ सिंह यांनी दिला खांदा

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. काल अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं. या सर्व जवानांना आज बडगाममध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आता या जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना खांदा दिला. .
पुलवामामधील अवंतीपुरात झालेल्या हल्ल्यामागे असणाऱ्यांना सोडणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याचा आणि जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला जाईल, अशा शब्दांमध्ये त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यानंतर आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी जवानांना कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचं म्हटलं. पाकिस्ताननं अधोगतीचा मार्ग निवडला आहे. दहशतवादी हल्ला करुन त्यांनी घोडचूक केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही, असं मोदी म्हणाले.