पुलवामा हल्ला: उद्या सर्वपक्षीय बैठक

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या ग्रंथालयात उद्या सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून या संकटकाळात संपूर्ण देश एकजूट असल्याचा संदेश दिला जाणार आहे.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त होत असून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारी पातळीवरही वेगवान हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी झाशी येथील सभेत बोलताना पुलवामाचा बदला घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आले आहे, असे स्पष्ट केले.