दक्षिण काश्मीरमध्ये अलर्ट : उरीनंतरचा मोठा हल्ला

दक्षिण काश्मीरमध्ये अलर्ट
हल्ल्यानंतर तत्काळ पुलवामात असलेलं सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आलं आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तूर्त बंद करण्यात आली आहे. आसपासच्या भागात मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय पुलवामा, शोपियाँ, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उरीनंतरचा सर्वात मोठा हल्ला
उरीमध्ये १८ सप्टेंबर २०१६ रोजी घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. तो हल्लाही जैशच्या दहशतवाद्यांनीच केला होता.
पुलवामा हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यावर निषेध नोंदवला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
काश्मीर पुन्हा एकदा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला लक्ष्य केले असून आयईडी स्फोटात किमान ३९ जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून हल्ल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.