शासकीय योजनांचा लाभ घेताय ? घरावर भाजपचा झेंडा लावा !!

‘मेरा परिवार, भाजपा परिवार’
देशात सर्वच राज्यात भाजपा ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या मोहिमेंतर्गत संपर्क साधणार असल्याचे वृत्त असून या मोहिमेंतर्गत शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्याच्या तसेच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला पाठींबा मागण्यात येणार आहे.
भाजपाने मंगळवारी ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या देशव्यापी मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत भाजपाला ५ कोटी सदस्य आणि समर्थकांना आपल्या घरावर भाजपाच्या समर्थनार्थ झेंडा लावावा लागणार आहे. २ मार्चपर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.
भाजपा या मोहिमेद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे समर्थन मिळवण्यासाठी आक्रमक पद्धतीने तयारीला लागली आहे. महाराष्ट्रात असे फोन अनेकांना आल्याचे या व्यक्तींनी महानायक ऑनलाईनशी बोलताना सांगितले . दरम्यान, भाजपाच्या या मोहिमेवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात असून हा लाजिरवाणा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपा इतक्या खाली घसरला आहे ज्या योजना सरकारी पैशांनी चालतात त्याचा राजकीय फायदा घेत आहे. हा उघड उघड सरकारी पैशाचा दुरुपयोग आहे.