Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काकीनेच केला अल्पवयीन पुतण्याचा लैंगिक छळ !!

Advertisements
Advertisements
Spread the love

‘पीडित मुलाचं एका वर्षाहून अधिक काळ लैंगिक शोषण

केरळमध्ये नऊ वर्षांच्या मुलावर त्याच्या ३६ वर्षीय काकीनंच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलानं केलेल्या आरोपानंतर तेनिपलम पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलानं ही बाब स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
डॉक्टरनं या घटनेबाबत चाइल्डलाइन संस्थेला माहिती दिली. त्यांनी मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. ‘पीडित मुलाचं एका वर्षाहून अधिक काळ लैंगिक शोषण करण्यात आलं. या प्रकारामुळं मुलाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. आरोपी महिला ही त्याची काकी असून, त्याच्या शेजारीच राहते, अशी माहिती चाइल्डलाइनचे (मलप्पुरम) समन्वयक के. अन्वर यांनी दिली. चाइल्डलाइननं दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाचे कुटुंबीय आणि आरोपी महिलेच्या कुटुंबामध्ये वाद होता. या वादातून हा आरोप करण्यात आला आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत. या प्रकरणी लवकरच आरोपी महिलेचा जबाब नोंदवून घेऊ, असं पोलीस उपनिरीक्षक बीनू थॉमस यांनी सांगितलं.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!