मोदींची वेळ झाली आता गडकरींची : भविष्यवाणी

राष्ट्रीय ज्योतिष परिष
देत ज्योतिषी भूपेश गाडगे यांची भविष्यवाणी !
राज्याच्या विधानसभेत भाजपाची सत्ता येण्याची शाश्वती कमी आहे। परंतु, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कायम राहील।राज्यात भाजपा आपला मुख्यमंत्री बनवू शकणार नसल्याने युतीतील शिवसेनेची ताकद वाढणार आहे राजकीय क्षितिजावर बडे नेते म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे समोर येतील तर सन २०१९ च्या लोकसभेत केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली।
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे। परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा माघारण्याची जोरदार चर्चा झडत आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुळापासून उखडून फेकण्याचा दावा काँग्रेस करीत असून, पाच वर्षांनंतर पुन्हा काँग्रेस सत्तेत येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे। यावर ओंकारेश्वरचे ज्योतिष विश्वविद्यालयाचे अध्यक्ष भूपेश गाडगे म्हणाले, भाजपा सत्तेत तर येईल; मात्र काही पक्षांच्या बहुमताशिवाय ते शक्य होणार नाही। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती येथे १७ जानेवारी रोजी पहिले ज्योतिष संमेलन झाले। त्यावेळी देशभरातून आलेल्या १२९ ज्योतिष्यांनी विविध विषयांवर भविष्य वर्तविले। राजकारणावरही त्यावेळी चर्चा पार पडली। सन २०१९ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येईल। काही महिन्यांसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील। नोव्हेंबर २०१९ नंतर मोदींची गच्छंती होऊन नितीन गडकरी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळेल, असेही भूपेश गाडगे म्हणाले।