IndiaNewsUpdate : बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीमुळे जेएनयूनंतर जामियामध्ये गोंधळ, ४ विद्यार्थ्यांना अटक

जेएनयूनंतर आता जामिया विद्यापीठातही पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून गदारोळ झाला आहे. जामिया विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगमुळे ४ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (२५ जानेवारी) सांगितले की, आज बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले असून विद्यापीठ परिसरातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
जामिया युनिव्हर्सिटीच्या चीफ प्रॉक्टरच्या आदेशानुसार बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगपूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची बैठक किंवा कोणत्याही चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यास परवानगी दिली जाणार नाही. निहित हितसंबंध असलेल्या लोकांना/संस्थांना शांततापूर्ण शैक्षणिक वातावरण खराब करण्यापासून रोखण्यासाठी विद्यापीठ सर्व उपाययोजना करत आहे. असे करणाऱ्या आयोजकांवर शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल.
काल संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून गदारोळ झाला होता.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री नऊ वाजता या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगची घोषणा केली होती. मात्र, स्क्रीनिंगपूर्वीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील लाईट गेली होती. दरम्यान प्रशासनाने वीज आणि इंटरनेट खंडित केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांनी नंतर आंदोलन केले आणि ती डोकमेंटरी मोबाईल फोनवर बघणार असल्याचा दावा केला असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीवीपी) सदस्य असल्याचा आरोप काहींनी केला. मात्र, एबीवीपी ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. यादरम्यान दगडफेकही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi Police detains protesters sloganeering outside Jamia University
Read @ANI Story | https://t.co/66W388T8Ha#DelhiPolice #BBCDocumentary #JamiaUniversity pic.twitter.com/FrZKUs3VtL
— ANI Digital (@ani_digital) January 25, 2023
बीबीसी ‘इंडियाः द मोदी प्रश्न’ काय आहे प्रकरण?
बीबीसीच्या ‘इंडियाः द मोदी प्रश्न’ या डॉक्युमेंट्रीवरून वाद सुरू आहे. ही डॉक्युमेंट्री २००२ च्या गुजरात दंगलीवर आधारित आहे जेव्हा नरेंद्र मोदी (पीएम मोदी) राज्याचे मुख्यमंत्री होते.या डॉक्युमेंट्रीचा भारत सरकारकडून निषेध करण्यात आला असून शुक्रवारी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि यूट्यूबला डॉक्युमेंटरीच्या लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. ही डॉक्युमेंट्री भारतात बॅन करण्यात अली आहे. मात्र, त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर आणि फेसबुकवर अपलोड करण्यात आले आहेत.
औरंगाबाद : सीआयडी कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत केली आत्महत्या
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055