MaharashtraNewsUpdate : GoodNews : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या लेखी परीक्षांच्या तारखा ठरल्या….

मुंबई : परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने उमेदवारांना गोंधळात टाकणाऱ्या चुका केल्यामुळे परीक्षार्थी संभ्रमित झाल्यामुळे आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांनी या परीक्षांना स्थगिती दिली होती. आता यातील गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आज (सोमवार) आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे. ऐनवेळी हि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. होते. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात आज महत्वपूर्ण माहिती दिली आहे.