MumbaiCrimeUpdate : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ , कंपनीचे कर्मचारीच होताहेत साक्षीदार

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रांला फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक केली. या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली. राज कुंद्रा हेच या रॅकेटचे मुख्य सूत्रधारअसून यासंबंधीचे पुरावेही मिळाले असल्याचे पोलिसांनी म्हटले होते . या प्रकरणाला नवीन वळण लागले असून, कंपनीतील चार कर्मचारीच या प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत.
अश्लील चित्रपट निर्मिती आणि अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. या पॉर्न चित्रपट प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. तसेच विआन आणि दुसऱ्या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली असून या कार्यालयात पोलिसांना एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली.
मुंबई पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणात राज कुंद्रा यांचेच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत. राज कुंद्रा आणि इतर आरोपी चौकशीत पुरेसे सहकार्य करत नाही मात्र, आता कंपनीतीलच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार बनण्यास तयार आहेत. हे चार कर्मचारी या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
Four employees of businessman Raj Kundra have turned into witnesses in the pornography racket case in which he is an accused: Mumbai Police Sources
— ANI (@ANI) July 25, 2021
नवीन अभिनेत्रींना ड्रग्स दिले जातात…
दरम्यान राज कुंद्राचा तपास चालू असताना आता अभिनेत्री श्रुति गेराने आणखी काही खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की नवीन अभिनेत्रींना ड्रग्स देऊन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना पॉर्न चित्रपटांमध्ये काम करायला भाग पाडले जाते. तिच्या म्हणण्यानुसार, तिला २०१८ मध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकाने राज कुंद्राच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारल्याचे तिने सांगितले. मात्र मला कोणत्या कास्टिंग डायरेक्टर्सने फोन केला होता हे आठवत नाही. पण , एकाने मला सांगितले की तो माझी ओळख राज कुंद्राशी करून देईन, दुसऱ्याने सांगितले की राज त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा विचार करत आहे आणि तो वेब सीरिज सुरु करणार आहे. मी लगेच नाही म्हणाले. तेव्हा मी नाही म्हणाली यासाठी आता मी स्वत:ची आभारी आहे. आम्हाला सगळ्यांना वाटलं की तो एक चांगला आणि मोठा माणूस आहे पण तो तर अश्लील चित्रपट बनवतो,” असे श्रुतिला म्हणाली.
पुढे नवीन येणाऱ्या कलाकारांसोबत चित्रपटसृष्टीत कसे वागतात या विषयी श्रुति म्हणाली, “या चित्रपटसृष्टीत बरचं काही घडलं आहे. नवीन अभिनेत्रींना ड्रग्स दिले जातात, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून अश्लील चित्रपट करण्यास भाग पाडले जाते. हे फक्त अभिनेत्रींना नाही तर अभिनेत्यांसोबतही केले जाते.”