जावयाची पुरुषत्वाची टेस्ट करायची घेतले दंडाधिकार्यांकडून आदेश,खंडपीठाने फटकारले

औरंगाबाद – निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षकाला नांदेडच्या दंडाधिकार्यांनी वैद्यकीय पुरुषत्वाची टेस्ट करण्याचे आदेश दिल्या प्रकरणी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दंडाधिकार्यांना फटकारत नपुसंकत्वाची टेस्ट करण्याचे आदेश रद्द केले.
एका निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षकाने मुलीला जावाई शरीरसुख देत नसल्याचा ठपका ठेवत नांदेड न्यायदंडाधिकार्यांकडून जावायाची वैद्यकीय पुरुषत्वाची टेस्ट करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात जावया विरुध्द नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलीने मानसिक शारिरीक छळ प्रकरणाची फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल आहे.हा प्रकार पाहून जावायाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.या प्रकरणावर सुनावणी होत.न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दंडाधिकार्यांनी दिलेले आदेश रद्द करंत दंडाधिकार्यांना फटकारले. या प्रकरणात याचिका कर्त्याच्या वतीने अँड.प्रशांत नागरगोजे यांनी काम पाहिले