PrakashAmbedkarNewsUpdate : दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर नाही : प्रकाश आंबेडकर

अमरावती : “आम्ही काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला आहे, पण अजून त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. आम्ही आमची जेवढी चादर आहे तेवढे हातपाय पसरतो. तेवढाही न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या पक्षांबरोबर का जावे ,” असा प्रश्न उपस्थित करून ‘सीट ऑर नो सीट, वोट फॉर काँग्रेस’ अशी गवईंसारखी भूमिका आमची नाही.”असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अमरावती दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की , “आम्ही आमची मते किती हे लोकसभेत दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्ही आमची चादर पाहतो आणि तेवढेच पाय पसरतो. आता आम्ही आमच्या चादरीप्रमाणे पाय पसरनये अनेकांना आवडत नाही, पचत नाही. आम्ही गवईंप्रमाणे राजकारण करत नाही. मिळाले तर ठीक, ‘सीट ऑर नो सीट, वोट फॉर काँग्रेस’ अशी भूमिका आमची नाही.”
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “सावंतांनी स्वागत करू असे म्हटले आहे. सावंतांना माहिती आहे की, ते माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे ते स्वागत करत असतील. त्यांच्या पक्षाने कुथे स्वागत केले आहे. व्यक्ती आणि पक्ष हे वेगळे आहेत. त्यांच्या पक्षाने म्हटले पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही त्याचे उत्तर देऊ.”
दरम्यान वंचितच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महिनाभरापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत सांगितले होते की , आम्ही दोन पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत. एक काँग्रेस आणि दुसरा शिवसेना. मात्र, दोघांकडून अद्याप कसलेही उत्तर आलेले नाही,” असे ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केले.