Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BeedNewsUpdate : भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर संघटना श्रेष्ठ , २०२४ च्या तयारीला लागण्याचे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन …

Spread the love

बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकाजा मुडेंसह, खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या कि , संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही, यावेळी त्यांनी २०२४ च्या तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.


भगवान गडावरील आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी भगवान गडावर हजारोंची गर्दी जमली होती. पंकजा मुंडेंच्या आधी जानकर आणि प्रितम यांची भाषणे झाली. दरम्यान, पंकजा मुंडेच्या भाषणानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ झाला. पंकजांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे तिथे एक गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर गोंधळ कमी झळा या सर्व गोंधळात एका कार्यकर्त्याचे तीन तोळ्यांचे लॉकेट तर अनेकांची पाकिटे चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

 ‘माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही मैने, पर खुद को गिरा के कुछ उठाया नही मैने’,

‘जरुरत से जादा इमानदार हू मै, इसलिए सबके नजरो मे गुन्हेगार हु मै’

असे शेर पेश करीत पंकजा यांनी आपल्या मनातील असंतोषाला अप्रत्यक्षरीत्या वाट करून दिली. मात्र, दुसऱ्या बाजूला आपण बंडाची तलवार पूर्णपणे म्यान केल्याचे स्पष्ट संकेतही पंकजा यांनी दिले. तसेच आता आपले एकमेव लक्ष्य हे २०२४ सालची परळी विधानसभेची निवडणूक असल्याचेही पंकजा यांनी सांगितले. २०२४ मध्ये पक्षाने मला परळी मतदारसंघातून तिकीट दिले तर मी काम करेल. आता मला पक्षाला आणि कोणत्याही नेत्याला त्रास द्यायचा नाही. आता आपण केवळ समर्पणाच्या भावनेतून काम करायचे आहे. २०२४ मध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

आमचा मेळावा चिखल तुडविणारांचा …

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबईतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. “मुंबईतही आज दसरा मेळावा आहे. पण त्यांचा मेळावा म्हटलं की राजकीय चिखलफेक असते. पण आपला मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही. तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं संघर्ष करणं आमच्या रक्तातच आहे. कधीच मी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. कधीच संधीचा फायदा घेतला नाही ते आमच्या रक्तातच नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

संघर्ष कुणालाच चुकलेला नाही…

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या कि , “आयुष्यात संघर्ष कुणाला चुकलेला नाही. छत्रपती शिवरायांना संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराजांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ४० वर्षांच्या राजकारणात साडेचार वर्ष सत्तेची सोडली तर इतर संपूर्ण काळ संघर्षाचाच होता. त्यामुळे त्यांच्यासमोर माझा संघर्ष काहीच नाही”.

भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर संघटना श्रेष्ठ असते. हा विचार मला पूर्णपणे मान्य आहे. भाजपमधील प्रत्येकाला हा नियम लागू आहे. त्यामुळे आता भाजपमधील कोणत्याही निवडणुकीसाठी किंवा पदासाठी माझ्या नावाचा आग्रह धरू नका. या सर्व चर्चांना पूर्णविराम देऊन २०२४ मधील निवडणुकीच्या तयारीला लागा. आता आपल्याला पक्षासाठी समर्पणाच्या वृत्तीने आणि झोकून देऊन काम करायचे आहे, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!