Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : उच्च न्यायालयाच्या निकालांनंतर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन …

Spread the love

मुंबई  : शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी उच्च  न्यायालयाने परवानगी देताच , दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजत गाजत या, पण आपल्या पंरपरेला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  दिली आहे.  दरम्यान या निकालानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष करीत अनेक  ठिकाणी पेढे वाटले.  हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांना देत शांततेत मुंबईला येण्याचे निमंत्रण  दिले.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, १९६६ पासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे कि ,  उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारस्याला गालबोट लावू नका.. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. तेज्याच्या वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशासह जगभरातील मराठी माणसाचं लक्ष असतं. त्यामुळे उत्साहात या, वाजत गाजत या, पण कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहित नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहोत. या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आणि जगात राहणाऱ्या बांधवांचं लक्ष लागले आहे. दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवाचा  मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे. विजया दशमीचा मेळावा… पहिला मेळावाही मला आठवतोय… आजोबांचं भाषण आजही माझ्याकडे आहे.. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!