Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खेरी : दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला चकमकीनंतर अटक …

Spread the love

लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : लखीमपूर खेरी येथील दोन किशोरवयीन बहिणींवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला आज सकाळी चकमकीनंतर अटक करण्यात आली. चकमकीदरम्यान पोलिसांनी त्याच्या उजव्या पायावर  गोळी झाडली. पोलिसांनी सांगितले की, जुनैद हा दोघांपैकी एक होता, जो कथितपणे मुलींचा मित्र होता आणि तो त्यांना मोटारसायकलवर आपल्यासोबत घेऊन जात असल्याचे आढळले होते. मात्र, मुलींशी त्याची कोणतीही मैत्री नव्हती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.


या प्रकरणी माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, छोटू नावाच्या व्यक्तीने या मुलींची जुनैद आणि सोहेलशी ओळख करून दिली होती. “हे दोघे काल त्यांना उसाच्या शेतात घेऊन गेले, जिथे त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यांनतर मुलींनी आता त्यांच्याशी लग्न करावे लागेल, असे सांगितल्यानंतर ते संतापले. आणि हफिजुलच्या मदतीने त्यांनी मुलींचा गळा दाबून खून केला, त्यानंतर त्याने करीमुद्दीनला बोलावले आणि आरिफने मुलींना फाशी देण्यास आणि त्यांनी आत्महत्या केल्यासारखे वाटण्यास मदत केली.

छोटू हा पीडितेचा शेजारी आहे, तर इतर पाच जण जवळच्या गावातील आहेत. या प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. मुलींच्या वडिलांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, राज्यातील भाजप सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे सांगितले आहे. दरम्यान सरकारने यावर अशी कृती करण्याचे आश्वासन दिले की , त्यांच्या भावी पिढ्यांचा आत्माही हादरून जाईल.

हे प्रकरण उघडकीस आल्यांनतर बसपा आणि समाजवादी पक्षासह विरोधकांनीही मागील प्रकरणांचा हवाला देऊन उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था कशी ढासळली आहे याचा हा नवा पुरावा असल्याचा आरोप केला आहे.

झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले मृतदेह …

लखीमपूर येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. एक सातवी आणि दुसरी दहावीची विद्यार्थिनी होती. काही मुलांनी मुलींचे दुचाकीवरून अपहरण केले, बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप आईने केला आहे. शवविच्छेदनानंतर गुरूवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


तत्पूर्वी दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे कुटुंबीयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. ही प्रक्रिया सुमारे तीन तास चालली असून सर्व ऑनकॅमेरा करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात या दोघींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे पुष्टी झाली आहे. आधी दोन्ही बहिणींची गळा आवळून हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह फासावर लटकवण्यात आल्याचे अहवालातून समोर आले.

दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांना लोकांच्या संतापला सामोरे जावे लागले. एसपी संजीव सुमन त्यांच्या समजूतीसाठी गेले, मात्र त्यांच्याशीही गावकऱ्यांनी बाचाबाची केली. परिस्थिती अशी झाली की, यूपी सरकारने आयजी लक्ष्मी सिंह यांना रातोरात लखीमपूरला पाठवले, त्यांनी रात्रभर गावात मुक्काम करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

सुमारे १५तासांनंतर गुरुवारी सकाळी एसपी संजीव सिंह यांनी निघासन येथील या घटनेत मुलींना जबरदस्तीने नेले नव्हते. आरोपींनी त्यांना आमिष दाखवून नेले. बलात्कार केला, आणि मग जेव्हा मुली लग्नाच्या मुद्द्यावर अडून बसल्या तेव्हा त्यांनी खून केला अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!