Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : भारताला ‘मैन्यूफैक्चरिंग हब’ बनविण्याचा संकल्प , SCO परिषदेत पंतप्रधान …

Spread the love

समरकंद : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या वार्षिक परिषदेसाठी पोहोचल्यानंतर या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि , “आम्हाला भारताला ‘मैन्यूफैक्चरिंग हब’ बनवायचे आहे. शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार असून यादरम्यान दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा अजेंडा व्यवसाय आणि राजकारण असेल असे सांगण्यात येत आहे.


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोरोना आणि युक्रेन संकटाचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणाले कि,  “साथीचा रोग आणि युक्रेनच्या संकटाचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे जगामध्ये अन्न आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.”

यावेळी पंतप्रधानांनी चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला एकमेकांच्या देशांतून जाण्याची परवानगी दिली पाहिजे.  भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा प्रयत्न करत आहे. SCO मध्ये हिंदीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत स्टार्टअप आणि इनोव्हेशनच्या क्षेत्रातील अनुभव जगाला शेअर करू शकतो.

एससीओच्या मोठ्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय बाजरीचा  प्रचार केला. ते म्हणाले की आम्हाला उर्जेची गरज सुरक्षित करायची आहे, त्यासाठी बाजरी हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू शकतो. बाजरी खाद्य महोत्सवही आयोजित केला पाहिजे. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात भारतातील पर्यटनाला चालना देण्याचा संकल्प घोषित करून पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्हाला पारंपारिक औषधांना प्रोत्साहन द्यायचे आहे. आम्ही या क्षेत्राचे नेतृत्व करू.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!