Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘राजपथ’ झाला आता ‘कर्तव्यपथ’ , पंप्रधानांच्या हस्ते उदघाटन …

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर  वर्षानुवर्षे राजपथ म्हणून ओळखला जाणारा हा मार्ग आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल. याठिकाणी पंतप्रधानांनी  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले . यादरम्यान, ते म्हणाले की २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पावर काम करणार्‍या सर्व कामगारांना आमंत्रित केले जाईल.


ते पुढे म्हणाले, “आज आपण भूतकाळ मागे टाकून उद्याचे चित्र भरत आहोत. आज सर्वत्र दिसणारी नवीन आभा म्हणजे नव्या भारताच्या आत्मविश्वासाची आभा आहे. आज आपले राष्ट्रीय नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मोठा पुतळा इंडिया गेटजवळ बसवण्यात आला आहे. गुलामगिरीच्या काळात ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज देशाने त्यांचा पुतळा स्थापन केला आहे. नेताजींनी त्याच ठिकाणी आधुनिक, सशक्त भारताचे जीवनही दिले आहे.

सुभाषचंद्र बोस हे एक महान व्यक्ती…

पंतप्रधान म्हणाले, “सुभाषचंद्र बोस हे एक महान व्यक्ती होते, जे पद आणि संसाधनांच्या आव्हानाच्या पलीकडे होते. संपूर्ण जगाने त्यांना नेता मानले. त्यांच्याकडे धैर्य, स्वाभिमान होता. त्यांच्याकडे कल्पना, दूरदृष्टी होती. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता होती, धोरणे होती. जर आपल्या भारताने स्वातंत्र्यानंतर सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता तर आज देश कोणत्या उंचीवर गेला असता.पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपल्या या महान व्यक्तीचा विसर पडला. त्यांचे विचार, त्याच्याशी निगडीत प्रतीकांकडेही दुर्लक्ष केले गेले.”

पीएम मोदी म्हणाले, “मार्गच  जर ‘राजपथ’ असेल, तर मग प्रवास लोकमुखी कसा होईल? राजपथ ब्रिटिश राजासाठी होता, ज्यांच्यासाठी भारतातील लोक गुलाम होते. राजपथाचा आत्माही गुलामगिरीचे प्रतीक होता, त्याची रचनाही तशीच होती.  गुलामगिरीचे प्रतीक होती. आज या  वास्तूतही बदलली आहे आणि तिचा आत्माही बदलला आहे.” ते म्हणाले, “आजच्या या निमित्ताने मला त्या कामगार सहकाऱ्यांबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करायची आहे ज्यांनी केवळ कर्तव्याचा मार्गच काढला नाही, तर आपल्या श्रमाच्या कळसातून देशाला कर्तव्याचा मार्ग दाखवला.”

“उद्यापासून तीन दिवस नेताजींवर ड्रोन शो देखील होणार आहे. या आणि कर्तव्य पथावर सेल्फी घेऊन अपलोड करूया ,” ते  म्हणाले ‘कर्तव्य पथ’ हा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ आहे आणि पादचाऱ्यांसाठी लाल ग्रॅनाइट दगडांनी बनवलेला पायवाट त्याची भव्यता वाढवतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!