Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : ब्राह्मण संस्कारी असतात…, बिल्किस बानोच्या आरोपीच्या बचावात उतरले भाजपचे गोध्राचे आमदार

Spread the love

अहमदाबाद : बिल्किस बानो अत्याचार प्रकरणात सोडण्यात आलेले  सर्व ११ दोषी आढळून आलेले लोक ब्राह्मण होते. इतकेच नाही तर तुरुंगातून सुटलेल्या या ११ दोषींचे पुष्पहार आणि मिठाई देऊन स्वागत करणाऱ्यांचे गोध्रा येथील भाजप आमदार सीके राऊलजी यांनी समर्थन करताना सर्व आरोपी हे ब्राहमण आहेत आणि ब्राह्मण संस्कारी असतात म्हणूनच ते तुरुंगात चांगले राहिले असे धक्कादायक विधान केल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत.


आमदार राऊल जी यांनी एका स्थानिक YouTuber ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. राऊलजी म्हणाले कि , त्यांनी काही गुन्हा केला आहे की नाही हे मला माहीत नाही पण गुन्हा करण्याचा हेतू नसावा. कारण ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण चांगले आचरण करणारे , संस्कारी  म्हणून ओळखले जातात, असे ते म्हणाले. कदाचित कोणीतरी त्यांना ‘फसवून’ शिक्षा करण्याचा वाईट हेतू असेल. परंतु तुरुंगात असताना ते  चांगले  वागले.

काय म्हणाले सीके राऊलजी ?

आमदार राऊलजी यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. भाजप आमदाराच्या या विधानावर आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी ट्विट केले की, ‘आझादी का अमृत काल है’ या सारख्यांची ‘विषारी अमृत-वाणी’ ऐका आणि शरमेने मान खाली घालावी की आम्हाला ७५ व्या वर्षी मध्ययुगाची  पुनरावृत्ती पाहण्यास भाग पाडले जात आहे. तरीही जय हिंद म्हणा…

राऊलजी हे गुजरात सरकारच्या पॅनेलमधील भाजपच्या दोन नेत्यांपैकी एक होते ज्यांनी एकमताने बलात्कार करणाऱ्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणातील एका दोषीने ‘माफी’ मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारकडे सोपवण्यात आले.

राहुल गांधी यांची टीका

यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, गुन्हेगाराची सुटका ही महिलांप्रती भाजपची क्षुद्र मानसिकता दर्शवते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल यांनी ट्विट केले की, “उन्नाव – भाजप आमदाराला वाचवण्याचे काम केले. कठुआ – बलात्काऱ्यांच्या बाजूने रॅली काढली. हाथरस – सरकार बलात्काऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. गुजरात – बलात्काऱ्यांची सुटका आणि सत्कार केला. गुन्हेगारांना पाठिंबा देणे हे भाजपची महिलांबाबतची मानसिकता दर्शवते. पंतप्रधान जी, तुम्हाला अशा राजकारणाची लाज वाटत नाही का?” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.

गोध्रा येथील साबरमती ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारातून पळून जात असताना बिल्किस बानो २१ वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. २००२ च्या गोध्रा नंतरच्या दंगलीत तिच्या कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता.

१५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची सुटका झाल्यानंतर, गर्भवती मुस्लिम महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीच्या हत्येचा आरोप असलेल्या दोषींचे तुरुंगाबाहेर मिठाई आणि हार घालून स्वागत करण्यात आले. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २००८ मध्ये बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांची शिक्षा नंतर मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.

दरम्यान, या प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्यात आली. गोध्रा येथील कारागृहात ते शिक्षा भोगत होते. शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याचे गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राज कुमार यांनी सांगितले होते.

दरम्यान तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया संयोजक वाय सतीश रेड्डी यांनी व्हिडिओ ट्वीट करत गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा आता बलात्काराच्या प्रकरणातील दोषींना चांगल्या संस्काराचे व्यक्ती म्हणत असल्याचे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!