Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : अखेर राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर , कोणाला कोणते खाते ?

Spread the love

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर जाहीर केले आहे. हे खातेवाटप पुढील प्रमाणे आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :  गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

असे आहे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ

१. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
२. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
३. चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
४. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
५. गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
६. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
७. दादा भुसे-बंदरे व खनिकर्म
८. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
९. सुरेश खाडे-कामगार
१०. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
११. उदय सामंत- उद्योग
१२. प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
१३. रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
१४. अब्दुल सत्तार- कृषी
१५. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
१६. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
१७. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
१८. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!