Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : सरकार नमले , वाढीव जीएसटीचा निर्णय मागे, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब…

Spread the love

नवी दिल्ली : देशातील जनतेचा सुप्त रोष आणि विरोधकांचा विरोध लक्षात घेऊन संसदेत काही उत्तर देण्याच्या ऐवजी केंद्रीय अर्थछमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून वाढीव  जीएसटी मागे घेत असल्याचे म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (मंगळवार, १९ जुलै) दुसरा दिवस आहे. आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी खासदारांनी महागाई आणि वाढत्या किमतीवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांचा गदारोळ पाहता लोकसभा अध्यक्षांनी आधी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले, नंतर ते उद्यापर्यंत तहकूब केले. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले. 

यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने सुट्या धान्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्र सरकारने ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. तसेच ज्या वस्तूंवर आधी जीएसटी होता, त्यातही १८ टक्केपर्यंत वाढ केली होती. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी गदारोळ माजविला असून  जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने माघार घेतली आहे.

जुलमी जीएसटीला देशभरातून होत होता मोठा विरोध…

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २५ किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५% जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता होती. त्यामुळे आधीच महागाई असताना केंद्राने जुलमी जीएसटी लावल्याने जनतेत रोष निर्माण होऊ लागला होता.

दोन्हीही सभागृहांचे कामकाज तहकूब

दरम्यान लोकसभेबरोबर राज्यसभेतही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई, काही अत्यावश्यक खाद्यपदार्थांवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे आणि संरक्षण सेवांमध्ये भरतीची अग्निपथ योजना या मुद्द्यांवरून गदारोळ केला. तत्पूर्वी काल, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या सर्व मुद्द्यांवरून गदारोळ झाल्याने तासाभरात राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सल्ला दिला आहे. सभागृहाच्या आत आणि बाहेर दुटप्पी वृत्ती चालणार नाही, असे ते म्हणाले. बिर्ला म्हणाले की, हे लोक घराबाहेर शेतकरी आणि महागाईवर बोलतात पण घरातील शेतकरी आणि महागाई यावर बोलत नाहीत. ते म्हणाले की, गेल्या अधिवेशनात महागाईवर चर्चा झाली होती, मात्र तेव्हा विरोधकांनी महागाईवर चर्चा केली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!