Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Assembly News Update : शिवसेना आणि बंडखोर यांच्यात व्हिपवरून जुंपण्याची चिन्हे …

Spread the love

मुंबई : राज्य विधानसभेच्या विधानमंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोर गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी शिवसेनेचा व्हिप झुगारून केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याची टीका  शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे तर विरोधी गटाचे नेते आ. केसरकर यांनी आमचा गट अधिकृत असून शिवसेनेच्या १६ आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे वक्तव्य केले. दरम्यान या विषयावरून सभागृहाच्या बाहेर हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

https://twitter.com/ANI/status/1543534916419260416

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील वाद सभागृहात दिसून आली. शिवसेनेच्या ३९ बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील १३ कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवड पार पडली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. त्यानंतर नवनिवार्चित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी म्हटले की, विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे. आपण कधीकाळी शिवसेनेत नंतर राष्ट्रवादी गेलात. त्यानंतर भाजपात गेलात. मागील १५ दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदा मंत्री होतील असे वाटले  होते. नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ज्यांना कायदा मंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले असे प्रभू यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील असे वाटलं होतं. मात्र, आमचं दु:ख विसरून देवेंद्र यांचं दु:ख मित्र म्हणून मोठं वाटलं असल्याचेही प्रभू यांनी म्हटले.

व्हिपवरून वाद सुरूच

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झरवळ यांना पत्र लिहीले. या पत्रात प्रभू यांनी, पक्षाच्या आदेशाविरोधात ३९ आमदारांनी मतदान केले असून त्याची नोंद घ्यावी अशी विनंती केली. उपाध्यक्षांनी हे पत्र रेकॉर्डवर आणले. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नावर्केर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. गोगावले यांनी पक्षाच्या १६ आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले असल्याचे पत्रात म्हटले. या पत्राची विधानसभा अध्यक्षांकडून नोंद घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे प्रतोद भरत गोगावले असा उल्लेख केला.

यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, अध्यक्ष महोदय मी आपले निवडीसाठी अभिनंदन करतो, त्यामुळे आज राजकीय भाषणे होत नसतं. या ठिकाणी भाषणे झाली त्याच्यामध्ये व्हीपचा उल्लेख झाला, तसा आम्हीही काढलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसवर दिला आहे. त्यामुळे आजचा दिवस चर्चा करायची नाही, अन्यथा आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा तुम्हाला व्हीप दिला आहे. आम्ही सुद्धा त्यांना अपात्रतेसाठी बोलू शकतो, पण आम्ही ते बोलणार नाही. आजचा प्रसंग तो बोलण्याचा नाही. प्रसंग आपला अभिनंदन करण्याचा आहे.

 या आमदारांनी  मतदान केलं नाही?

आज सभागृहात मुक्ता टिळक, भाजप, लक्ष्मण जगताप, भाजप, प्रणिती शिंदे, काँग्रेस, जितेश अंतापुरकर, काँग्रेस, राष्ट्रवादी
नवाब मलिक, अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे, एमआयएमचे
मुफ्ती इस्माईल, पीठासीन अधिकारी, नरहरी झिरवळ यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. तर सपा चे आमदार अबू आझमी आणि रईस शेख , एमआयएमचे शाह फारुख अन्वर तटस्थ राहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!