Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा सादर , काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार काम …

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  राजीनाम्याच्या निर्णयानंतर भाजपाने जोरदार सेलिब्रेशन केले आहे. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये जमलेल्या आमदारांनी या वृत्तानंतर एकच जल्लोष केला. विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवून आनंद साजरा केला. मात्र या निकालावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर ताज हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे हॉटेलबाहेर निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरले. त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी हात जोडून, “आम्ही तुम्हाला उद्या सर्वकाही सांगू,” असे  उत्तर पत्रकारांना दिले.

दिल्लीशी  बोलून निर्णय घेऊ : चंद्रकांत पाटील

या सर्व घडामोडीनंतर सरकार बनवण्याचा दावा कधी करणार ? याचे उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणलेले कि , त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू.

दरम्यान शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती असेही पाटील म्हणाले.

Click to listen highlighted text!