Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AgnipathAgitationUpdate : राहुल आणि प्रियांका गांधी यांची अग्निपथवरून केंद्र सरकारवर टीका

Spread the love

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘ज्याप्रमाणे कृषी कायदा मागे घ्यावा लागला, त्याचप्रमाणे अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “सलग 8 वर्षांपासून सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा कृषी कायदा मागे घ्यावा लागला , असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना  ‘माफिवीर’ बनून आणि देशातील तरुणांचा विचार करून  ‘अग्निपथ’ योजनाही परत घ्यावीच लागेल.


या ट्विटद्वारे राहुल यांनी केंद्र सरकारने सैनिक आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात म्हटले आहे कि , “सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या. 3 वर्षांपासून भरती झाली नाही, शर्यतीतील तरुणांच्या पायाला फोड आले, ते निराश आणि हतबल झाले आहेत. तरुण वायुसेना भरती निकाल आणि नियुक्त्यांची वाट पाहत होते. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, भरती थांबवली, सर्वकाही.” काँग्रेसच्या वतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ताज्या माहितीनुसार, काँग्रेसचे हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होणार असून त्यात अनेक बडे नेते आणि खासदार सहभागी होऊ शकतात.

दरम्यान, CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले की, CAPF आणि आसाम रायफल्समधील भरतीमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांसाठी 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. गृह मंत्रालयाने अग्निवीरांना CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी निर्धारित केलेल्या कमाल प्रवेश वयोमर्यादेत 3 वर्षे आणि अग्निपथ योजनेच्या पहिल्या बॅचसाठी 5 वर्षे सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!