Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदारांना राजकीय वारसा ….

Spread the love

नवी दिल्ली : घराणेशाहीवरून काँग्रेसला नेहमी टार्गेट करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदार घराणेशाहीतून आल्याची टीका काँग्रेसने केली आहे . या विषयावरून खोटे बोलणाऱ्या भाजपकडून जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवीत असे ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.


काँग्रेसने म्हटले आहे कि , जे मोदी घराणेशाहीमुळे राजकारणासह प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळला जात असल्याचं बोलतात मात्र त्यांच्याच पक्षात २००९ मध्ये १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातून होते. आता सद्यस्थितीत भाजपातील २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातील आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. खोटे  बोलले  जात आहे. जनतेला या प्रश्नांची उत्तरे  हवी आहेत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले आहे कि , “भाजपाचे २५ टक्के खासदार नेत्यांच्या घरातून आलेत. अनेक केंद्रीय मंत्री देखील राजकीय घराण्यांमधून आले आहेत. असे  असताना भाजपाने घराणेशाहीवर बोलणे समजण्यापलीकडचे आहे.” काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीवरील टीकेवर निशाणा साधला आहे. मोदींनी घराणेशाही राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचं वक्तव्य केलं होतं. हेच नमूद करत काँग्रेसने २००९ पासून आजपर्यंतच्या भाजपामधील घराणेशाहीची आकडेवारी सांगितली आहे.

काँग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २००९ मध्ये भाजपात १२ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील होते. हे प्रमाण वाढून आता सद्यस्थितीत २५ टक्के खासदार नेत्यांच्या कुटुंबातील आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!