Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल ‘अपमानास्पद’ वक्तव्य : कानपुरात दंगल, ३६ जणांना अटक

Spread the love

कानपूर : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त आणि कथित ‘अपमानास्पद’ वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला आहे. या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शुक्रवारच्या नमाजानंतर दुकाने बंद ठेवत असताना दोन समुदायांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक आणि बॉम्ब फेकले. ते शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 36 जणांना अटक केली असून याप्रकरणी तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.


पोलिसांच्या वतीने दोन एफआयआर तर जखमी व्यक्तीच्या वतीने एक एफआयआर लिहिण्यात आला आहे. या एफआयआर मध्ये 40 जणांची नावे असून 100 हून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींवर गँगस्टर कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कानपूर हिंसाचारात 13 पोलीस आणि दोन्ही बाजूचे 30 जण जखमी झाले. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, कानपूरच्या परेड स्क्वेअर, नई सडक आणि यतिमखाना भागात हिंसाचार झाला असून तेथे सुरक्षा कडक करण्यात आली आहे आणि सखोल पाळत ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस दल देखील परिसरात तैनात करण्यात आले आहे, ज्यात 12 कंपन्या आणि एक प्लाटून पीएसी यांचा समावेश आहे. राष्ट्रपती कोविंद आजपर्यंत तर पंतप्रधानही काल कानपुरात होते. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरच्या आयुक्तांशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

याबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त विजय सिंह मीना म्हणाले, “…३६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. व्हिडिओच्या आधारे आणखी लोकांची ओळख पटवली जात आहे.” ते पुढे म्हणाले, “गँगस्टर कायद्यांतर्गत कट रचणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि त्यांची मालमत्ता एकतर जप्त केली जाईल किंवा पाडली जाईल.”

कानपूरमध्ये शुक्रवारी कथित बाजार बंदवरून वेगवेगळ्या समुदायांच्या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. पोलिसांनी सांगितले की, काही लोकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या भागातील हिंसाचार सुरू झाला, ज्याला दुसऱ्या गटाने विरोध केला. जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची पोलिसांशी झटापटही झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

IndiaNewsUpdate : काय आहे प्रकरण ? भाजप महिला प्रवक्त्याविरुद्ध मुंबई , पुणे आणि हैदराबादेत गुन्हे दाखल , कानपुरात दंगल, योगींचें कडक धोरण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!