Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात १ हजार ३५७ नवीन कोरोनाबाधित , काळजी घेण्याचे आवाहन

Spread the love

मुंबई : राज्यात आज दिवसभरात राज्यात १ हजार ३५७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आज रोजी राज्यात एकूण ५ हजार ८८८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ झाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान आज ५९५ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३७,९५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे झाले आहे.  तर राज्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,३५,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९१,७०३ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान राज्यात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्स सोबत बैठक घेतली आणि नागरिकांना नियम पाळा, मास्क वापरा असे आवाहन केले आहे. तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचे  राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. जिथे गर्दीची ठिकाणं आहेत, तिथे मास्क असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!