AurangabadNewsUpdate : औरंगाबादकरांच्या पाणी प्रश्नासाठी भाजपचा आज जल आक्रोश मोर्चा

औरंगाबाद : औरंगाबादकरांच्या पाणी प्रश्नासाठी भाजपकडून आज शहरात जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस स्वतः यामोर्चाचे नेतृत्व करीत आहेतदरम्यान याच विषयावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे . विशेष म्हणजे शहरातील विविध रस्त्यावर पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये बॅनर युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे.”आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय? या आशयाचे बॅनर शिवसेनेच्यावतीने भाजपच्या बॅनरच्या बाजूला लावण्यात आले आहे.
दरम्यान पडेगाव भागात भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर अज्ञाताने फाडल्या फाडल्याचे निदर्शनास येताच सेना -भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.
आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणुका होणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे गेले अनेक वर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजप कडून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.
या जल आक्रोश मोर्चासाठी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड , शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर , आमदार अतुल सावे, समीर राजूरकर, राजेश मेहता, दौलत खान पठाण, हर्षवर्धन कराड, आदींनी जोरदार तयारी केली आहे.
खैरे -डॉ . कराड यांच्यात शाब्दिक खडाजंगी
मोर्च्याच्या विषयावरून शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका करताना भाजपच्या मागे कुणीही नाही परंतु पैशाचा वापर करून गर्दी जमा केली जाईल आणि त्यात भाजप माहीर असल्याची टीका केली त्यावर खैरे यांचे वक्तव्य आम्ही गम्बीर्याने घेत नसल्याचे प्रत्युत्तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहे.