Aurangabad News Update : शहराच्या विकासात भाजपानेच अडथळा आणला : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून युती मधे असलेल्या भारतीय जनता पक्षाने शहराच्या विकासात अडथळे आणले आहेत.असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर सभेत आपला एकेरी उल्लेख केला.फडणवीस मोठे नेते आहेत.त्यांना शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यासाठी जवळपास आतापर्यंत १००वेळा भेटल्याचे त्यांनीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितले. तसेपत्रव्यवहारही झाल्याचे खैरेंनी पत्रकार परिषदेत पुरावे दाखवले.त्याच प्रमाणे शहराचा पाणी प्रश्न या आठवड्यात सुटणारच अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच मी भ्रष्टाराचार केल्याची ओरड करणार्यांनी तसे पुरावे द्यावे आपण राजकारणातून सन्यास घेऊ असेही खैरे म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, इम्तीयाज जलील हा बेअकली खासदार असून त्याने शहरात काहीच काम केले नसल्याचे मुस्लीम बांधव आपल्याला भेटून सांगतात असेही खैरे म्हणाले.
डाॅ.भागवत कराड ला नगरसेवक, महापौर म्हणून मी ओळख दिली. आणि आज ते मलाच काही कळंत नाही म्हटल्यानंतर आपल्याला आश्र्चर्य वाटल्याचे खैरे म्हणाले.या पत्रकार परिषदेला माजी महापौर नंदू घोडेले,कला ओझा यांचीही उपस्थिती होती.