Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraSportsUpdate : वर्ल्ड स्कूल जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी निशांत करंदीकर करणार भारताचे प्रतिनिधीत्व

Spread the love

नारायण सावंत । मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले (रजि.) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल पार्लेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जिम्नॅस्टिक खेळाडू निशांत करंदीकर हा १३ ते २३ मे २०२२ या कालावधीत फ्रांस येथे होणाऱ्या आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०२२ साठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दरम्यान निशांतच्या या कामगिरीची दाखल घेऊन  राज्याचे क्रीडामंत्री  सुनीलजी केदार यांनी निशांतसह महाराष्ट्रातील निवड झालेल्या इतर दोन खेळाडूंना तसेच भारतीय संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निशांत करंदीकर हा खेळाडू १८ वर्षांचा असून तो साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले येथे शिक्षण घेत आहे. २०१४ पासून प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात निशांत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स खेळाचा सराव करत आहे. त्याने ८ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण २४ सुवर्ण, २६ रौप्य व १३ कांस्य पदके पटकावली आहेत. त्याने २०१७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्ण पदक तसेच २०१९ मध्ये गुजरातमधील सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निशांतने रौप्य पदक पटकावले आहे. निशांतने २०२१ मध्ये बांगलादेशमधील ढाका येथे झालेल्या साऊथ सेंट्रल एशीयन चॅम्पीयमशीप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २ रौप्य आणि २ कांस्य पदके पटकावली आहेत. निशांतला प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे. निशांतचा प्रशिक्षक शुभम गिरी, जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेते हरीश परब आणि जिम्नॅस्टिक प्रशिक्षक नीलम बाबरदेसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन निशांतला लाभत आहे.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची वाटचाल

मुंबई नगरीचे माजी महापौर-माजी आमदार डॉ रमेश यशवंत प्रभू यांनी १९९८ साली प्रबोधनकार  ठाकरे क्रीडा संकुल नावाचे एक रोपटे लावले त्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. सुरवातीला संकुलात असणाऱ्या जागतिक मापाच्या तलावात फक्त जलतरणाचे प्रशिक्षण दिले जात होते आता या ठीकाणी जल तरणाबरोबर जिम्नॅस्टिक, एअर रायफल शुटिंग, क्रिकेट, फुटबॉल, पिकलबॉल, टेबल टेनिस , कराटे, ज्युडो, स्केटिंग, मल्लखांब, व्यायाम, स्पोर्ट्स रिकव्हरी सेन्टर, आदी क्रीडा प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. संकुलाचे अनेक खेळाडू, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्पर्धांमध्येभाग घेत पदके मिळवीत आहेत, डॉ रमेश प्रभू यांचे एक स्वप्न होते की माझ्या क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे, आणि त्या दृष्टीनेपदाधिकारी, विश्वस्तआणि प्रशिक्षक यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय संसंघामध्ये महेंद्र बाभूळकर (संघाचे प्रशिक्षक), आर्यन दवंडे सहभागी जिम्नॅस्ट महाराष्ट्र), मानस मनकवळे (सहभागी जिम्नॅस्ट महाराष्ट्र), निशांत करंदीकर          (सहभागी जिम्नॅस्ट महाराष्ट्र), दीपेश लष्करी ( सहभागी जिम्नॅस्ट मध्यप्रदेश), प्रणव मिश्रा ( सहभागी जिम्नॅस्ट उत्तर प्रदेश)  यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!