Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SportsNewsUpdate : जिम्नॅस्ट अनुष्का पाटीलला शिष्यवृत्ती , अनेक पदकांनी सन्मानित 

Spread the love

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (ISO प्रमाणित) तर्फे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सर्व विश्वस्तांच्यावतीने स्व. डॉ. पुष्पा रमेश प्रभू यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संकुलाचे विश्वस्त व सचिव डॉ. मोहन राणे यांच्या शुभ हस्ते ज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट अनुष्का पाटीलला २५ हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या वर्षांपासून दरवर्षी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संकुलातील एका पात्र खेळाडूला शिष्यवृत्ती(स्कॉलरशिप) देण्यात येणार आहे. यावर्षी २०२२-२३ च्या पहिल्या शिष्यवृत्तीची मानकरी संकुलाची ज्युनिअर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट अनुष्का पाटील ठरली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, विश्वस्त मकरंद येडुरकर, लीना प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक पदकांनी सन्मानित

अनुष्का अजित पाटील एक राष्ट्रस्तरीय जिम्नॅस्ट आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने चमकदार कामगिरी करत जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व उत्तम कामगिरी करत बॅलंसिंग बीम प्रकारात १ सुवर्ण व सांघिक रौप्य पदक मिळवून एप्रिल २०२२ मध्ये हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. २०१९ साली तिने उत्तम कामगिरी करत सब स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व उत्तम कामगिरी करत वैयक्तिक २ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून दिला. तिने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स करण्यास ४ वर्षांची असताना प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले येथे सुरुवात केली व आजही ती ह्याच संकुलात प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज साधारण ७ हे ८ तास आपला सराव करत आहे.

अनुष्का ७ वर्षांची असताना तिने मुंबई स्कूल्स स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पर्धेमध्ये २ सुवर्ण पदके पटकावली. तसेच त्याच दिवशी तिने विबग्योर इंटरनॅशनल स्कूल्सने आयोजित केलेल्या आंतर शालेय स्पर्धेमध्येही २ सुवर्ण पदके पटकावली. तिने अनेक आंतरशालेय, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आजपर्यंत एकंदर ५ ट्रॉफीज व २७ सुवर्ण, २० रौप्य व १३ कांस्य अशी एकंदर ६० पदके मिळवली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!