Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : मार्च अखेरपर्यंत पॅन आधार असे लिंक करून घ्या अन्यथा होऊ शकतो १० हजाराचा दंड !!

Spread the love

मुंबई  : आयकर विभागाच्या  नियमांनुसार तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जर लिंक केले नसेल तर 31 मार्चपर्यंत करून घ्या अन्यथा तुमच्यावर  10,000 रुपये दंड  भरण्याची वेळ येऊ शकते.


असे करू शकता तुमचे पॅन-आधार  लिंक…

जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या पायऱ्या फॉलो करून ते लिंक करू शकता.

सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal या साइटला भेट द्या

यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला ‘Link Aadhaar’ टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक, आधार क्रमांक, नाव आणि मोबाइल क्रमांकाचा तपशील विचारला जाईल.

हा सर्व  तपशील भरल्यानंतर, तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला OTP मिळेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी भरून  सबमिट केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड आणि आधार लोंक झाल्याचा मॅसेज तुम्हाला मिळेल.

जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार आधीच लिंक केलेले असेल तर तुम्हाला त्याची माहितीही मिळू शकेल.

याशिवाय तुम्ही तुमचा पॅन आणि आधार एसएमएसद्वारे देखील लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून 567678 किंवा 56161  या दोनपैकी कोणत्याही एका नंबरवर UIDPAN फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा लागेल.

Click to listen highlighted text!