Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsLiveUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला मराठीतून प्रारंभ.

विविध योजनांचे विमोचन मोदी यांच्या हस्ते होत आहे. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणी…

राज्यात महत्वाच्या पदावरील व्यक्तीकडून अशोभनीय वक्तव्य केली जात आहेत . छतंत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असेच वक्तव्य करण्यात आले याकडे अजित पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता संवेदनशील मुद्द्याला हात घातला.  पवार म्हणाले कि , अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेक मागण्या 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार 

https://www.instagram.com/tv/CawVRxyjRDH/?utm_medium=copy_link

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे  विमानतळावर पीएम मोदी यांचे आगमन झाले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , मंत्री सुभाष देसाई, देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव यांनी त्यांचे स्वागत केले.  या स्वागतानंतर त्यांनी महापालिकेकडे प्रस्थान केले. मोदी आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला आहे. त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.


दरम्यान मोदींसाठी बनवलेल्या फेट्याचा वाद मिटला असून काँग्रेसच्या आक्षेपानंतर ‘त्या’ फेट्यावरील ‘राजमुद्रा’ काढली आहे. या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे. सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात करण्यात आल्यानंतर  पंतप्रधानांनी स्वत: गरवारे मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढत मेट्रोने प्रवास करून विद्यार्थ्यांशी बातचीत केली.  24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते आज होत आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे.

पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते होणार आहे. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केलं जाणार असून ते पुनरुज्जीवन करणार आहे. यात नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असणार आहे.

1470 कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प एक शहर एक ऑपरेटर या संकल्पनेवर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. याशिवाय  पंतप्रधान मोदी बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही लोकार्पण करणार आहेत.

यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन होईल. या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे. जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमात आहेत. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान मोदी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सुरुवात करणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!