Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेंगा’ ? राज्यपाल बी.एस.कोश्यारी यांच्या वक्तव्याने संताप

Spread the love

औरंगाबाद : ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेंगा’;  असे वक्तव्य केल्यामुळे राज्याचे राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी केल्यामुळे राज्यात त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  आपल्या औरंगाबाद दौऱ्याच्या दरम्यान  राज्यपाल कोश्यारी यांनी  एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्यपाल यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.


औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या, समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारले असते ? असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे”.

“समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे”

कोश्यारी पुढे म्हणाले कि , “मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे,” असंही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं.

राज्यपालांवर टीका…..

दरम्यान राज्यपाल बीएस कोश्यारी यांचे हे वक्तव्य सगळीकडे व्हायरल होताच अनेक वृत्तवाहिन्यांवर बोलताना शिवचरित्र सांगणारे लेखक आणि विचारवंत यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत टीका केली आहे. राज्यातील ज्येष्ठ इतिहासकार संशोधक आणि शिव चरित्र अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं आहे की, राज्यपाल कोश्यारी हे बेताल, निराधार आणि खोडसाळ वक्तव्य करण्यात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत . राज्याचे राज्यपाल होऊन त्यांना दोन वर्ष झाले आहे. त्यामुळे त्यांनी महाराजांबद्दल अभ्यास करावा. तसेच समर्थ रामदास कधीच महाराजांचे गुरु नव्हते मात्र, तरीही असं सांगून राज्यपाल यांनी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. यामुळे राज्यपाल यांनी तात्काळ मागे माफी मागावी, असेही कोकाटे म्हणाले.

राज्याचे राज्यपाल बी.एस.कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजीला  कोण विचारेल ? असे एकेरी आणि  वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल  राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच उद्या सोमवारी पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे . त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.”

“शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”

“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असे   कोश्यारी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!