Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लाहोर भारतात न आल्यामुळे काँग्रेसने पाप केले , आपल्या भावना दुखावल्या : नरेंद्र मोदी

Spread the love

अमृतसर : पंजाबविधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पुन्हा एकदा काँग्रेसवर आरोप करताना म्हटले आहे कि, भारतीय सैन्य फक्त आणखी ६ किलोमीटर पुढे गेले असते , तर गुरूनानक देव यांची तपोभूमी भारतात राहिली असती. मोदी यांनी याला देशाची फाळणी, १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१चे आणि बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा दाखला आहे. “जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा काँग्रेसचे लोक होते. यांना एवढेही समजले नाही की, सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला (लाहोर) भारतात घेतले जावे . काँग्रेसच्या लोकांनी पाप केले आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत”, असे मोदी यावेळी म्हणाले. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी इतर चार राज्यांसोबतच पंजाबमध्ये देखील मतमोजणी होणार आहे.

काय आहेत या घटना

या प्राश्वभूमीवर पहिली घटना म्हणजे भारताची फाळणी आणि दुसरी घटना म्हणजे १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध होते. ते म्हणाले कि , “१९६५च्या लढाईमध्ये भारतीय सेना लाहोरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या इराद्यानेच पुढे निघाली होती. ती जर तेव्हा दोन पावलं पुढे गेले असते, तरी गुरुनानक देवजींची तपोभूमि आपल्याकडे असती. अशा प्रकारे काँग्रेसने दुसरी संधी देखील तिसरी घटना १९७१ चे बांग्ला देश युद्ध या युद्धात ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा दिल्लीत बसलेल्या सरकारमध्ये दम असता, तर ते म्हणाले असते की हे सैनिक तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा आम्हाला गुरुनानक देवजींची तपोभूमि परत मिळेल. सहा प्रकारे तीन-तीन संधी काँग्रेस सरकारने गमावल्या”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससोबतच आम आदमी पक्षावर देखील निशाणा साधला आहे. “एकानं पंजाबला लुटलं, दुसरा दिल्लीत एकापाठोपाठ एक घोटाळे करत आहे. एकाच माळेचे मणी असूनही आता हे दोन्ही पक्ष पंजाबमध्ये एकमेकांविरोधात असल्याचं नाटक करत आहेत. पण खरं तर हे आहे की काँग्रेस जर ओरिजिनल पक्ष आहे, तर दुसरा त्याची फोटोकॉपी आहे”, असं मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!